हॉट बेबच्या यादीत सनी लियॉन

भारतातील बिग बॉस-५ मध्ये सामील झालेली कॅनडाची पॉर्न स्टारला आता जगातील सर्वात हॉट महिलांच्या यादीत स्थान मिळाले आहे. पुरुषांचे सर्वात लोकप्रिय मॅगझीन ‘आस्क मॅन’ने जगातील हॉट-९९ महिलांची यादी प्रसिद्ध केली. त्यास सनी लियॉनला ८२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

Updated: Feb 6, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com, लंडन

भारतातील बिग बॉस-५ मध्ये सामील झालेली कॅनडाची पॉर्न स्टारला आता जगातील सर्वात हॉट महिलांच्या यादीत स्थान मिळाले आहे. पुरुषांचे सर्वात लोकप्रिय मॅगझीन ‘आस्क मॅन’ने जगातील हॉट-९९ महिलांची यादी प्रसिद्ध केली. त्यास सनी लियॉनला ८२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

‘आस्क मॅन’ च्या यादीत भारतातील तीन अभिनेत्रींनीही स्थान पटकावले आहे. यात ‘अग्निपथ’द्वारे चर्चेत आलेल्या प्रियंका चोपडाने ७० वा क्रमांक पटाकवला आहे. मात्र, सनीने ८२ क्रमांक पटकावल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सनीचा क्रमांक हॉटच्या यादीत यापेक्षाही पुढे हवा, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मात्र, अजून वेळ गेलेली नाही, पुढील वर्षी जिस्म-२मध्ये झळकल्यावर सर्वात हॉटच्या यादीत सनी फार मोठा पल्ला गाठेल असा तिच्या चाहत्यांनी विश्वास आहे.

यात सर्वात आश्चर्याची गोष्टमध्ये फ्रिडा पिन्टोला प्रियंका आणि सनीच्या पुढे स्थान मिळाले आहे. ती या यादीत ५८ व्या क्रमांकावर आहे. स्लमडॉग मिलेनियरने चर्चेत आलेल्या फ्रिडाचे भारतापेक्षा परदेशात अधिक चाहते आहेत.