www.24taas.com, मुंबई
काही लोक आमीर खानच्या टीव्ही शो 'सत्यमेव जयते' याबाबत नाराज आहे. हा शो यावर्षी सहा मे पासून झाला. आमीर खानच्या भन्नाट विचारसरणीवर बेतलेल्या या शोसाठी अनेकजण टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात. समाज बदलण्याची कुठेतरी सुरवात होत असल्याची भावना यामागे आहे. सत्यमेव जयतेने टीव्ही प्रेक्षकांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणलं आहे.
रविवारी लाखो लोक टीव्हीसमोर येऊन हा शो पाहत असतात. आणि त्याचा फायदा म्हणजे या शोचा असणारा टीआरपी जबरदस्त वाढलेला आहे. नुकतंच आमीरला त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आल ं की, तुमच्या शोच्या टीआरपी बाबत तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा आमीर म्हणाला की,सध्या आम्हांला टीआरपी बाबत काहीही चिंता नाहीये. 'मी तुम्हांला सांगतो की, मला माहितीये की आमच्या प्रेक्षकांची संख्या ही खूप जास्त आहे'. मला माहित नाही की, जाहीरातदार यासाठी नक्की काय करतात ते... याचं खास कारण आहे.
'मी टीआरपी बाबात अजिबात चिंता करीत नाही. कारण की टीआरपी आकडे हे फक्त सात हजार बॉक्सच्याद्वारे ठरविण्यात येतात. आणि आपण कसं ठरवणार की, हे सात हजार टीआरपी बॉक्स भारतात कुठे आहेत आणि ते आमचा शो पाहतच असतील की नाही'... 'टीआरपी ह्यापेक्षा प्रेक्षक ही गोष्टच फार वेगळी आहे. मला काळजी असते ती माझ्या प्रेक्षकांबाबत... टीआरपीपेक्षा ते मला नेहमी महत्त्वाचे आहेत'.