आमदार कर्डिलेंचा राजकीय दरबार...

निवडणुकांच्या तोंडावर अटकेत असलेले राजकीय नेतेही सक्रीय झाले आहेत. नगर जिल्ह्यातले राहुरीचे भाजपचे आमदार आणि दोन गुन्ह्यांत आरोपी असलेले शिवाजी कर्डिले निवडणुकांच्या काळात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

Updated: Jan 17, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, अहमदनगर

 

निवडणुकांच्या तोंडावर अटकेत असलेले राजकीय नेतेही सक्रीय झाले आहेत. नगर जिल्ह्यातले राहुरीचे भाजपचे आमदार आणि दोन गुन्ह्यांत आरोपी असलेले शिवाजी कर्डिले निवडणुकांच्या काळात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये सध्या कर्डिले समर्थक कार्यकर्त्यांची गर्दी असून, हॉस्पिटलमधून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची व्यूव्हरचना करीत आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये कर्डिलेंचा राजकीय दरबार सर्रास भरवला जात असूनही, पोलीस मात्र याकडं सोयीस्करपणं दुर्लक्ष करतायेत. या राजकीय दरबाराचा 'झी 24 तास'नं पर्दाफाश केला.

 

गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेले कर्डिले राजरोसपणे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना भेटत असून तिकीट वाटप करत असल्याची चर्चा आहे. अशोक लांडे खून प्रकरण आणि कांकरिया यांची फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीराव कर्डिले अटकेत आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, सध्या त्यांचा मुक्काम येरवडा जेलमध्ये आहे. मात्र प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत, क्रडिले ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. कर्डिले यांच्या राजकीय दरबाराकडं पोलीसही अर्थपूर्ण व्यवहारानं दुर्लक्ष करत असल्य़ाचा आरोप करण्यात येतोय.