काँग्रेसचा झेडपीसाठी जाहीरनामा प्रकाशित

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं. मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. 'काँग्रेसचा हात ग्रामविकासाला साथ' ही घोषणा देण्यात आली आहे. '

Updated: Feb 1, 2012, 01:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं. मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.  'काँग्रेसचा हात ग्रामविकासाला साथ' ही घोषणा देण्यात आली आहे. 'ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प' या जाहीरनाम्यात सोडण्यात आला आहे.

 

'घरात शौचालय, दारात पाणी', पाच वर्षांत जवाहर विहिर योजनेंतर्गत ३ लाख विहीरी खोदण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. इंदू मिलच्या जागेवर आंबेडकर स्मारक बांधण्यासाठी लवकरच सुरवात करणार, मुलींना पदवीपर्यंत आणि मुलांना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण, शेतक-यांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, तीन लाखापर्यंत दोन टक्के व्याजाने कर्ज, नववीमधील विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी जातीचे दाखले शाळेतच देणार.

 

याशिवाय मराठी तरुणांना बँका, रेल्वे, इन्कम टॅक्स आणि कस्टम कार्यालयात नोकरीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. भारिप बहुजन महासंघ, पिपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडीचा हा संयुक्त जाहीरनामा आहे.