राज्यात झेडपी मतदान ७० टक्के

राज्यातल्या २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी महापालिकांबरोबच १७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही काँग्रस या निवडणूकीत स्वबळावर लढले.

Updated: Feb 7, 2012, 09:24 PM IST

www.24taas.com

 

राज्यातल्या २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ७० टक्के मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी महापालिकांबरोबच १७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही काँग्रस या निवडणूकीत स्वबळावर लढले.  ग्रामीण भागात दोन्ही काँग्रेसला टक्कर देण्याचा प्रयत्न महायुतीनं केला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झालं. उस्मानाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तर संघर्षाचे केंद्र ठरलेल्या बीडमध्ये शांततेत मतदान झालं. तर नेहमी प्रमाणे सिधुदुर्गमध्ये हाणामरी झाल्या मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली

 

तर  दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषदेसाठी शांततेत मतदान झालं. जिल्ह्यात पंचायत समितीच्या ७३ गटांतील ७१४ तर १४६ गणांतील १११४ उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं.  दुसरीकडं जळगाव जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसोबत पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी मतदान पार पडलं. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १५० जागांसाठी मतदान झालं.

 

कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं त्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

 

क्र. जिल्हे मतदानाची टक्केवारी
1 पुणे 65%
2 लातूर 65%
3 उस्मानाबाद 55%
4 नगर 62%
5 नागपूर 60%
6 औरंगाबाद 60%