www.24taas.com, नवी दिल्ली
सोन्यावरील उत्पादन शुल्क अखेर हटवण्यात आलं आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत हि घोषणा केली आहे. २०१२-१३ च्या बजेटमध्ये सोन्यावर उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतू या निर्णयानंतर सराफ व्यावसाय़िकांनी बंद पुकारून तीव्र विरोध केला होता. अखेर केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार उत्पादन शुल्क हटवण्यात आलं आहे. तसंच मालमत्ता खरेदी-विक्रीवरील 1 टीडीएसही हटवण्यात आला आहे.
सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी बजेटमधील काही कडक तरतुदींवर सरकार पुन्हा विचार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसे संकेतही अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीच दिले होते. संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. उद्या त्यावर मतदान होणार आहे. या निर्णयामुळे सराफ व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.