'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'

टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.

Updated: Aug 2, 2012, 01:57 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

 

टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे. देशाला सशक्त राजकीय पर्याय हवाय, तो टीम अण्णांनी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. देशाच्या जनतेकडून यासंदर्भात आपली मतं मागवावीत असं आवाहनही करण्यात आलं आहे

 

जनलोकपालसाठी लढा देणा-या टीम अण्णांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर टीम अण्णांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. शरीरात प्राण असेपर्यंत लढणार असल्याचं इशारा टीम अण्णांनी दिलाय. अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली असून मागे हटण्यास ते तयार नाहीत. अण्णांच्या कोअर कमिटीनंही त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र केजरीवाल यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिलाय.

 

टीम अणणांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांचे वजन पाच किलोनं तर गोपाल राय यांचे वजन सात किलोनं कमी झालंय. तर अण्णांचेही वजन चार किलोने घटले आहे. त्यामुळं या सर्वांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असला तरी अजून कुणाच्याही जीवाला धोका नसल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.