अण्णा - सोनियात चांगलीच जुंपली

लोकपालवरुन आता सोनिया गांधी आणि अण्णा हजारेत चांगलीच जुंपण्याची चिन्हं आहेत. सरकारचे लोकपाल बिल सशक्त असल्याचं सांगत लोकपालसाठी लढण्यास सरकार तयार असल्याचा इशारा सोनियांनी दिला आहे.

Updated: Dec 21, 2011, 08:03 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

लोकपालवरुन आता सोनिया गांधी आणि अण्णा हजारेत चांगलीच जुंपण्याची चिन्हं आहेत. सरकारचे लोकपाल बिल सशक्त असल्याचं सांगत लोकपालसाठी लढण्यास सरकार तयार असल्याचा इशारा सोनियांनी दिला आहे. टीम अण्णा आणि विरोधकांनी हे बिल मान्य करावे असा इशाराही सोनियांनी दिला आहे.

 

काँग्रेस भ्रष्टाचार मिटवण्यास कटीबद्ध असल्यांचं सांगत लोकपाल आणण्यासाठी आम्ही पुर्ण प्रयत्न करणार असल्याच सोनियांनी सांगितल आहे. तर सरकराचे लोकपाल बिल म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक असल्याची टीका अण्णा हजारेंनी केली आहे. सीबीआयला लोकपालच्या कक्षेतून बाहेर केल्याने लोकपाल बिल कमजोर झालं आहे. सरकार जनतेची थट्टा करत आहे अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. सशक्त लोकपाल बिल आल्य़ाशिवाय माघार घेणार नाही असा इशारा अण्णांनी दिला आहे.

 

लोकपालमध्ये सीबीआयचा समावेश केला नसल्याने अण्णांनी सरकारला चागंलच धारेवर धरले आहे. जर सीबीआय लोकपालच्या कक्षेत असते तर आज चिंदबरम जेलमध्ये असते अशी टीकाच अण्णांनी केली आहे.  तर भाजपसहित इथर विरोधकांचाही लोकपालच्या मसुद्याला विरोध आहे  त्यामुळे आता संसदेत आणि संसदेबाहेरही लोकपालचे युद्ध रंगण्याची चिन्हं आहेत.