दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागं पाकिस्तानस्थित 'हिजबुल मुजाहदिन' या संघटनेचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'एनआयए' या तपाससंस्थेच्या सुत्रांनी ही माहिती दिली. संसद हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरुची फाशी टळावी यासाठी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं एनआयएच्या सुत्रांनी म्हटलं आहे. या प्रकरणी जम्मूतील किश्तवाडच्या 'डॉक्टर वसीम'ला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. हायकोर्टाच्या बाहेर बॉम्ब ठेवणारे पाकिस्तानी होते अशीही माहिती 'एनआयए'ला मिळाली. 'एनआयए' आता बॉम्ब ठेवणा-या पकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.