...अशी झाली मुखर्जींच्या नावाची घोषणा

शुक्रवारचा दिवस दिल्ली दरबारी धावपळीचा ठरला. सकाळपासून ते प्रणव मुखर्जींची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात…

Updated: Jun 16, 2012, 08:30 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

शुक्रवारचा दिवस दिल्ली दरबारी धावपळीचा ठरला. सकाळपासून ते प्रणव मुखर्जींची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात…

 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून दिल्लीत दिवसभर खल सुरू होता. वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या डावपेचांच्या प्रयत्नात होते... त्यामुळेच शुक्रवारचा दिवसभर वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला.

वेळ सकाळी १०.३० वा.

समाजवादी पक्षाने राजकीय कोलांटउडी मारली. अब्दुल कलामांचं नाव न घेता, रामगोपाल यादव यांनी ममता यांच्या भूमिकेपासून फारकत घेतली.

 

सकाळी ११.०० वा.

राष्ट्रपती निवडणुकीबाबत एनडीएची महत्त्वाची बैठकीला सुरुवात झाली.

 

सकाळी ११.३० वा.

पाटण्यात नितीश कुमारांना भेटण्यापूर्वीच एपीजे अब्दुल कलामांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असं सांगितलं.

 

दुपारी १२.१० वा.

पंतप्रधानांच्या घरी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरु झाली.

 

दुपारी १२.१५ वा.

सपाचे खासदार किरणमय नंदा ममतांसह कलामांच्या उमेदवारीचं समर्थन करताना दिसले.

 

दुपारी १२.३० वा.

सपाचे आणखी एक नेते मोहनसिंग यांनी प्रणवदांची बाजू घेत, कलामांच्या उमेदवारीचा प्रश्नच येत नसल्याचं सांगत संभ्रमात भर टाकली.

 

दुपारी १२.४५ वा.

दिल्लीहून आग्र्यात दाखल झालेल्या मुलायमसिंहांनी कलामांच्या उमेदवारीवर मौन बाळगणचं पसंत केलं.

 

दुपारी १.०० वा.

राष्ट्रपतीपदावरुन दिल्लीत राजकीय तुफान सुरु सतानाच ममता बॅनर्जी कोलकात्याला रवाना झाल्या.

 

दुपारी १.१५ वा.

एनडीएची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. बैठकीत ना कलामांच्या उमेदवारीवर निर्णय झाला ना एनडीनं आपले पत्ते उघडले.

 

दुपारी १.३० वा.

पी. ए. संगमांची या नाट्यात एन्ट्री झाली. आपणही स्पर्धेत असल्याचं सांगत, कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

दुपारी २.०० वा.

युपीएचा घटक पक्ष असलेले द्रमुक नेते करुणानिधींनी कलामांच्या नावाचा वापर संभ्रम वाढवण्यासाठी होत असल्याचं वक्तव्य केलं.

 

दुपारी ३.०० वा.

पश्चिम बंगालमध्ये पडसाद उमटले. प्रदेश काँग्रेसनं तृणमूलशी संबंध तोडावेत, असं पत्र पक्षश्रेष्ठींकडे रवाना केलं.

 

दुपारी ३.३० वा.

डावेही प्रणव मुखर्जींना पाठिबा देणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

दुपारी ४.०० वा.

युपीची बैठक सुरु आली. तृममूल वगळता, सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती.

 

दुपारी ४.१५ वा.

पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अबदुल कलामांची भेट झाली.

 

दुपारी ४.३० वा.

युपीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींच्या नावाची घोषणा झाली.

 

.