कशी घडली प्रणव मुखर्जींची कारकीर्द

सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत असून काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी परिवाराशी एक निष्ठ असल्याचे मानले जाते.

Updated: Jun 15, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत असून काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गांधी परिवाराशी एक निष्ठ असल्याचे मानले जाते.

 

 

पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी पद्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच कलकत्ता विश्वविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवीही घेतली आहे. त्यांनी वकील आणि कॉलेजचे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. त्यांना मानद डी. लिट पदवीही मिळाली आहे.

 

राजकीय करिअर

प्रणवदांची संसदीय कारकीर्द पाच दशक जुनी आहे. १९६९मध्ये काँग्रेसचे राज्यसभा सदस्य म्हणून ते वरिष्ठ सभागृहात दाखल झाले. त्यानंतर ते १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ मध्ये पुन्हा राजसभा सदस्य म्हणून नियुक्त झाले. १९७३ मध्ये उद्योग मंत्रालयातील उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळात दाखल झाले होते.

 

१९८२ ते १९८४ वेगवेगळ्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. १९८४ मध्य ते पहिल्यांदा अर्थमंत्री झालेत. १९८४मध्ये युरोमनी मासिकाच्या सर्वेक्षणात जगातील सर्वात चांगले अर्थमंत्री म्हणून त्यांना पहिले स्थान मिळाले होते. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींचे समर्थक करणाऱ्या गटाचे शिकार झाल्याने त्यांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आले नाही.

 

 

काही काळासाठी त्यांना काँग्रेस पक्षातून काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र १९८९मध्ये राजीव गांधीशी तडजोड झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात आपला पक्ष सामाविष्ट केला. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात त्यांना योजना आयोगाचे उपाध्यक्ष पद देण्यात आले आणि १९९५-९६ मध्ये त्यांना पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार देण्यात आला. १९९७मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.