www.24taas.com, नवी दिल्ली
आज एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा २२वा दिवस आहे. अजूनही पायलट्सचा संप मिटलेला नाही. यामुळे आत्तापर्यंत जवळपास ३०० कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे.
तिकिटांचं रद्द होणं, कर्मचाऱ्यांचं काम करणं यामुळे एअर इंडियाचं मोठं नुकसान झालं आहे. काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आपत्कालीन योजना आणि जास्तीत जास्त तिकिटं स्वस्त श्रेणीमध्ये टाकल्यामुळे काही प्रमाणात नुकसान कमी झालं आहे. एप्रिलमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार १७.६ टक्क्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात चौथ्या स्थानावर होते.
विमानाच्या तिकटदरावर वेगवेगळे उपाय सुरू करण्यात आले आहेत. १ जूनपासून सात नियमित जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना रद्द करण्यात येणार आहे. यानुसार सरकारी विमान कंपनी रोज ४५ ऐवजी ३८च आंतरराष्ट्रीय उड्डाणं करेल. यूएई, ओमान, बहरीन, कुवेत, सिंगापुर, थाईलँड यांची उड्डाणं कायम राहातील. मात्र हाँगकाँग, ओसाका, सियोल, टोरंटो या ठिकाणी जाणारी विमान रद्द होणार आहेत.