कोलकात्यात रंगाचा झाला बेरंग...

कोलकाता नाइटरायडर संघाच्या आपीएल विजेतेपदानंतर कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर आज जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण, कौतुक सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनी आपल्या सेलिब्रिटीजला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मैदानातच एकच धिंगाणा केला त्यामुळे कौतुक सोहळ्याला हिंसेचा रंग मिळाला.

Updated: May 29, 2012, 04:47 PM IST

 www.24taas.com, कोलकाता

 

कोलकाता नाइट रायडर संघाच्या आपीएल विजेतेपदानंतर कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर आज जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण, कौतुक सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनी आपल्या सेलिब्रिटीजला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मैदानातच एकच धिंगाणा केला त्यामुळे कौतुक सोहळ्याला हिंसेचा रंग मिळाला.

 

कोलकाता नाइट रायडर्सची पूर्ण टीम, या संघाचा सहमालक शाहरुख खान आणि जुही चावला यांना लाखोंच्या संख्येनं लोक जमले होते. जवळजवळ ३० हजार लोक स्टेडियमच्या बाहेर उभे होते. स्टेडियम तर अगोदरच खचाखच भरलं होतं. आयपीएल चॅम्पियन टीमच्या सन्मान सोहळ्यानंतर गर्दी अशी काही उसळली की, आत येण्याच्या प्रयत्नात काहींनी बॅरिकेटस् तोडून टाकले. पोलिसांनी लाठीमार केल्यानं प्रेक्षक आणखी भडकले. या घटनेत अनेक जण जखमी झाले.

 

या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, रेल्वे मंत्री मुकूल रॉय यांच्यासोबत अनेक मंत्री उपस्थित होते. केंद्राकडे राज्यासाठी पॅकेज मागणाऱ्या ममता बॅनर्जींनी या सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये उधळले. या कार्यक्रमावर पश्चिम बंगाल सरकारनं ५० लाख रुपये खर्च केलेत. प्रत्येक खेळाडूला एक तोळ्याची सोन्याची चेन बक्षीस म्हणून देण्यात आली. अशा २५ चेन्सचं वाटप करण्यात आलं.