ए.राजा यांचे खाजगी सचिव चंडोलियांना जामीन

माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचे खाजगी सचिव आर.के.चंडोलिया यांना 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी पटियाळा हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीबीआयने ए.राजा आणि बेहुरा यांच्यासह चंडोलिया हे टूजी प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याने कडाडून विरोध करुन देखील त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Updated: Dec 1, 2011, 01:19 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचे खाजगी सचिव आर.के.चंडोलिया यांना 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी पटियाळा हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीबीआयने ए.राजा आणि बेहुरा यांच्यासह चंडोलिया हे टूजी प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याने कडाडून विरोध करुन देखील त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. विशेष सरकारी वकिल यु.युललित यांनी चंडोलिया यांनीच लायन्सेससाठीच्या अतिंम तारखांमध्ये फेरबदल केल्यामुळेच खाजगी कंपन्यांना लाभ झाल्याचं सांगत चंडोलियांच्या जामीनाला विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने, दिल्ली उच्च न्यायालयाने आणि विशेष न्यायालयाने आतापर्यंत या प्रकरणात ११ जणांना जामीन दिला आहे. त्याच आधारावर चंडोलियांच्या वकिलांनी जामीन मिळावा अशी विनंती न्यायालयाला केली.

 

विशेष न्यायालयाने मंगळवारी स्वान टेलिकॉमच्या शाहीद उस्मान बलवांना जामीन मंजूर केला. तर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी द्रमुकच्या खासदार कनिमोळी, कलियंगार टीव्हीचे प्रमुख शरद कुमार, सिनेयुगचे करिम मोरानी, कुसेगाव फ्रूटसचे राजीव अग्रवाल आणि असिफ बलवा यांची जामीनावर मुक्तता केली.

 

ए.राजा यांच्यासह चंडोलिया आणि बेहूरा यांना २ फ्रेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप करताना अधिकारपदाचा गैरवापर केल्याचा तसंच निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.