www.24taas.com, बंगळुरू
सेक्स स्कँडल विवादात अडकलेले बाबा नित्यानंद यांनी काल कोर्टामध्ये आत्मसर्मपण केलं. त्यानंतर बाबा नित्यानंद यांना अटक करण्यात आली. आणि आज लगेचच बाबांच्या आश्रमाला टाळं ठोकण्यात आलं. नित्यानंद बाबा आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यांच्यातील अश्लील व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर बाबा नित्यानंदावर अटक होण्याची शक्यता होती. मात्र त्यानंतर बाबा काही दिवस गायब झाले होते. पण काल त्यांना अटक करण्यात आली.
बलात्काराचा आरोप असलेले नित्यानंद बाबा यांना २०१० मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर असताना त्यांच्या समर्थक बाबांच्या आश्रमात मीडियाच्या काही लोकांवर हल्ला केला होता. त्यामुळे बाबा नित्यानंद चांगलेच अडचणीत आले होते.
विवादात अ़़डकलेले स्वामी नित्यानंद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तर स्वामी नित्यानंदांना लवकरच अटकेचा प्रयत्न पोलीस करीत होते. पोलिसांनी नित्यानंद यांच्या आश्रमाला चारही बाजूंनी पहारा दिला होती. त्यामुळे नित्यांनदवर अटकेची लटकती तलवार असल्याने तेथील आश्रम कर्मचारीही आश्रम सोडताना दिसत होते.