झुकझुक गाडीचे आरक्षण ४ महिने आधी करता येणार

भारतीय रेल्वेचे नवे आगाऊ तिकिट आरक्षणाचे नियम शनिवारपासून लागू झाले. आता नव्या नियमानुसार तुम्हाला १२० दिवस अगोदन तिकिटं आरक्षित करता येणार आहेत.

Updated: Mar 11, 2012, 08:49 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय रेल्वेचे नवे आगाऊ तिकिट आरक्षणाचे नियम शनिवारपासून लागू झाले. आता नव्या नियमानुसार तुम्हाला १२० दिवस अगोदन तिकिटं आरक्षित करता येणार आहेत. आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रेल्वेने आगाऊ तिकिट आरक्षणाचा कालावधी ९० दिवसांवरुन १२० दिवसांपर्यंत वाढवला आहे. आता १२० दिवस आधी आरक्षण करता येणार असल्याने प्रवशांना प्रवासाचे नियोजन चार महिने आधी करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितलं.

 

पण कमी अंतराच्या गाड्यांच्या आरक्षण कालावाधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसंच परदेशी पर्यटकांच्या ३६० दिवस आगाऊ आरक्षणाच्या कालावधीतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.