www.24taas.com, नवी दिल्ली
टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात अडकलेल्या माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी संसदेत हजेरी लावली. गेली १५ महिने राजा तिहारच्या जेलमध्ये होते.मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
राजा यांना विशेष सीबीआय न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या जामिनाला सीबीआयनं विरोध केला होता. मात्र न्यायालयानं त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामिनासाठी केलेल्या अर्ज सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीन मंजूर केला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून तिहार कारागृहात ए राजा होते. पटियाला हाऊस कोर्टानं मंगळवारी अटकेत असलेल्या माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना जामीन मंजूर केला. कोर्टाच्या निर्णयानंतर ए. राजांना तिहारमधून सोडण्यात आले आहे.
देशातल्या सर्वात गाजलेल्या घोटाळ्यातील इतर आरोपी संजय चंद्रा, स्वॉन टेलिकॉम प्रमोटर विनोद गोएंका, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा, हरि नायर, डीएमकेच्या खासदार कनिमोळी, कलाइनार टीव्हीचे तत्कालीन एमडी शरद कुमार, फिल्म निर्माता करीम मोरानी, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, शाहिद उस्मान बलवा यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.