www.24taas.com, मुंबई
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने गेल्या पाच महिन्यांत पहिल्यांदाच निच्चांक गाठला आहे. भारतीय रुपयाची किंमत ४७ पैशाने कमी हा दर ५४.२६ रुपयांवर स्थिरावला आहे. या घडामोडीचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला आहे.
अमेरिकी डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यानेच रुपयाचे अवमूल्यन झाले असल्याचे सांगण्यात आले. १५ डिसेंबर २०११ मध्ये रुपयाचा दर ५४.३२ एवढा होता. किरकोळ बाजारपेठेची अतिशय वाईट सुरवात आणि अमेरिकी चलनाच्या वाढलेल्या महत्त्वामुळे रुपया कोसळला आहे.
दरम्यान, अमेरिकी बाजार ५३.७८ रूपयांवर बंद झाला. त्यामुळे रूपया मूल्य कमजोर झाल्याने अमेरिका डॉलरला मागणी वाढली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम मुंबईतील शेअर बाजारावर झाला आहे. सेंसेक्स २५२.०७ अंकानुसार १.५४ टक्क्यांने तेजीने १६,०७६.१८ अंकावर खुला झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे ५४ अंशांहून अधिक अंशांनी घसरल्याचा फटका भारतीय शेअरबाजाराला बसलाय. अशक्त आशियाई बाजाराचा परिणामही भारतीय शेअरबाजारावर झालाय.
ग्रीसमधील निवडणुकीनंतरची राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे ग्रीस युरो झोनमधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक स्टॉक्स अस्थिर झालेत आणि त्याचाही परिणाम भारतीय शेअरबाजार झाल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसातली परदेशी फंडांची मोठ्या प्रमाणावर विक्रीही बाजार कोसळण्याला कारणीभूत ठरलीय. दुपारनंतर बाजार काहीसा सावरून सोळाहजारावर किंचीत वर स्थिरावला.