पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे- पंतप्रधान

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भारत जल सप्ताहाचं उदघाटन केलं. देशाच्या लोकसंख्येनुसार पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि दिवसेंदिवस ती कमीच होत चालली आहे. जगातली १७ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात आहे फक्त आणि चार टक्के पाण्याची उपलब्धता आहे.

Updated: Apr 10, 2012, 08:27 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भारत जल सप्ताहाचं उदघाटन केलं. देशाच्या लोकसंख्येनुसार पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि दिवसेंदिवस ती कमीच होत चालली आहे. जगातली १७ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात आहे फक्त आणि चार टक्के पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असल्याचं मनमोहम सिंग म्हणाले.

 

केंद्र सरकार या महिन्याच्या अखेर पर्यंत राष्ट्रीय जलनितीला अंतिम रूप देणार आहे. या सप्ताहाच्या अंतर्गत जल संकटावर मात करण्याच्या दृष्टीनं विचारविनीमय करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस जगातच पाण्याचं संकट गंभीर होत चाललं आहे. त्यामुळं पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याची योग्य साठवणूक झाली तरच दुष्काळाच्या संकटावर मात करता येणं शक्य होणार आहे.

 

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेबरोबर पाणी टंचाईचं संकटही दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. या प्रश्नाकडं नागरिकांनी गांभीर्यानं पाहून जलसंधारणाचा कार्यक्रम हा फक्त सरकारी न राहता त्यात त्यांनी सहभाग नोंदवणं गरजेचं झालं आहे. सरकारच्या धोरणांना नागरिकांनी प्रतिसाद दिला तरच हा कार्यक्रम यशस्वी ठरू शकतो.