यूपी पराभवानंतर काँग्रेसचे युवराज भडकले

उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाल केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

Updated: Apr 6, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, लखनऊ

 

 

उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे नेते हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

 

 

प्रचाराचा मोठा गाजावाजा होऊनही काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. पक्षाच्या बैठकीत सरचिटणीस राहुल गांधी यांनी हवाई नेत्यांवर जोरदार टीका केली. पक्षाला जनाधार असणारे नेते हवेत अशा शब्दात राहुल यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसची जबाबदारी राहुल गांधी यांच्या खांद्यावर होती.

 

 

जोरदार प्रचार करुनही काँग्रेसच्या स्थितीत काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळं काँग्रेसनं बैठकीत राहुल गांधी यांनी काही नेत्यांना टार्गेट केले आहे. यूपीतील पराभवानंतर दिल्लीत चिंतन बैठक सुरू झाली आहे. त्यावेळी पराभवाचे खापर नेत्यांवर राहुल यांनी फोडले आहे. त्यामुळे नेत्यांना याची चपराक मिळते का, की अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतात, याची चर्चा सुरू झाली आहे.