www.24taas.com, पाटणा
'रणवीर सेना'चे संस्थापक ब्रह्मेश्वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया (७०) यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आज पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे त्यांच्यावर गोळीबार केला.
बिहारमध्ये रणवीर सेना स्थापन केल्यानंतर ते प्रसिद्धिच्या झोतात आले होते. आज सकाळी हत्या झाल्याचे वृत्त समजताच बिहारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी घटना स्थळाला भेट दिल्यानंतर जमाव संतप्त झाला होता. गोळीबार करण्यासाठी हल्लेखोर मोटरसायकलवर होते.
ब्रह्मेश्वर सिंह यांनी बिहारमधील जातीसंघर्षाच्या काळात उच्च जातींच्या हितासाठी रणवीर सेनेची स्थापना केली होती. त्यानंतर १९८० ते १९९० या दशकामध्ये झालेल्या अनेक नरसंहाराच्या घटनांमध्ये रणवीर सेनेचाच हात असल्याचे जानले जाते. ब्रह्मेश्वर सिंह यांना बथानी टोला नरसंहार प्रकरणातून उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या निर्णयावर विविध स्तरातून टीकाही करण्यात आली होती.