रुपयाचं मूल्यं पुन्हा घसरलं...

डॉलरच्या तुलनेत निच्चांक नोंदवताना आज सकाळी रुपया विक्रमी ५५.०६ वर घसरला. काल रुपया ५५.०३ वर घसरला होता.

Updated: May 22, 2012, 11:33 AM IST

www.24taas.com, मुंबई

महागाई दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि रुपयाचं घसरणारं मूल्यं, यामुळं सामान्य जनतेच्या चिंतेतही दिवसेंदिवस भरच पडताना दिसतेय. डॉलरच्या तुलनेत निच्चांक नोंदवताना आज सकाळी रुपया विक्रमी ५५.०६ वर घसरला. काल रुपया ५५.०३ वर घसरला होता.

 

आरबीआयच्या उपाययोजना, सकारात्मक पातळीवर उघडलेला शेअरबाजार आणि डॉलरच्या तुलनेत आशियाई चलनांची सुधारलेली स्थिती यामुळे आज बाजार उघडताना रुपयाची कालच्या तुलनेतील किंमत ४२ पैशांनी सुधारलेली दिसली. मात्र काही वेळातच रूपयाची निच्चांकी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या सातत्यपूर्ण घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

डॉलरच्या तुलनेत या आठवड्यात रुपयाची निच्चांकी घसरण झाली. १९७३ नंतर पहिल्यांदाच एवढी रुपयाची घसरण झालेली दिसून आली. तर एप्रिल  २०११ ला एका डॉलरची किंमत ४४.४४ रुपये इतकी होती. तर मे २०१२ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २३ टक्क्यांची वाढ झालीए. यावरून पुढील वर्षांपर्यंत एका डॉलरची किंमत ५८ रुपयांपर्यंत पोहोचू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

वर्ष                    किंमत (रुपयांत)

 

२००५                   ४४.०१

२००६                   ४५.१७

२००७                   ४१.०२

२००८                   ४३.४१

२००९                   ४८.३२

२०१०                   ४५.६५

२०११                   ५२.५२

१८ मे २०१२         ५४.८२