लालकृष्ण अडवानींनी काळ्या पैशाच्या मुद्दावर सरकारला घेरलं

लालकृष्ण अडवानी यांनी परदेशी बँकांमध्ये असलेले २५ लाख कोटी रुपये देशात परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली. तसंच परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सर्व लोकांची नावे जाहीर करावीत अशीही मागणी केली.

Updated: Dec 16, 2011, 12:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लालकृष्ण अडवानी यांनी परदेशी बँकांमध्ये असलेले २५ लाख कोटी रुपये देशात परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली. तसंच परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सर्व लोकांची नावे जाहीर करावीत अशीही मागणी केली. लोकसभेत स्थगन प्रस्तावा अंतर्गत चर्चेची सुरवात करताना परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीय लोकांची नावांची यादी जाहीर करावी आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करु नये. ते असंही म्हणाले की सरकारला अशा ६०० लोकांच्या नावांची माहिती मिळाली आहे तरी देखील ती जाहीर करण्याबाबत सरकार चालढकल करत आहे.

 

लोकसभेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थित अडवानी म्हणाले की केवळ काळ्या पैशावर कर आकारुन त्यांना सोडून देणं एवढ्यावरच भागणार नाही तर त्यांना अशा लोकांना शिक्षा देखील व्हायला पाहिजे. काळ्या पैशाच्या संदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. सरकारने असा कायदा पारित करावा की ज्या अन्वये सर्व खासदारांना परदेशात त्यांची कोणतीही बेकायदेशीर बँक खाती किंवा संपत्ती नाही हे जाहीर करणं अनिवार्य व्हावं अशी मागणीही अडवानींनी
केली.