लेहमध्ये भूस्खलन, ४०० पर्यटक फसले

श्रीनगरमधील 'खारदुंग ला'तील लेह-नुब्रा व्हॅलीच्या मार्गावर १० किलोमीटरचे क्षेत्र भूस्खलनामुळे धोक्यात आले आहे. भूस्खलनामुळे १५० वाहनांसह ४०० लोक फसले गेले आहेत. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Updated: Jun 9, 2012, 03:23 PM IST

www.24taas.com, जम्मू

श्रीनगरमधील 'खारदुंग ला'तील लेह-नुब्रा व्हॅलीच्या मार्गावर १० किलोमीटरचे क्षेत्र भूस्खलनामुळे धोक्यात  आले आहे. भूस्खलनामुळे १५० वाहनांसह ४०० लोक फसले गेले आहेत. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने फसलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.  लेह-नूब्रा मार्गावर एक मार्गिका सुरू करण्यात यश आले आहे.  त्यामुळे मदत कार्यातील अडचणींवर मात करण्यात येत आहे.

वाचविलेल्या लोकांना २५ किलोमीटरपासून दूर असलेल्या 'दक्षिण पुल्लू' येथे औषधोपचार करण्यात येत आहे.  लेहपासून ४० किमीपासून दूर असलेल्या 'खारदुंग ला' येथे शुक्रवारी भूस्खलन झाले. यामध्ये १५० वाहने आणि ४०० पर्यटक अडकले होते. शुक्रवारी रात्री लष्करातील जवान आणि पोलीस यांच्या मदतीने एक संयुक्त अभियान सुरू करण्यात आले. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेण्यात आली. लडाखमधील 'खारदुंग ला' हा जगातला गाडी जाऊ शकणारा सर्वात उंच रोड आहे. त्यामुळे पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी खारदुंग पास हे एक महत्त्वाचं आकर्षक आहे.

.