www.24taas.com, नवी दिल्ली
शांती निकेतनमध्ये विद्यार्थिनीला स्वमुत्र पाजण्याची शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची पाठराखण करायला स्वामी अग्निवेश मैदानात उतरले आहेत. स्वामी अग्निवेश यांनी विद्यर्थिनीला लाजीरवाणी शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची बाजू घेत या प्रकरणाचं खापर मीडियावर फोडलं आहे.
रात्री झोपेत बिछाना ओला केल्यामुळे विश्वभारतीच्या पाथा भवन येथील करबी गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डन उमा पोद्दार यांनी पाचवीतील एका विद्यार्थिनीला स्वमूत्र प्राशनाची शिक्षा देण्याचे किळसवाणं कृत्य केलं होतं. देशाभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र अशा प्रसंगी स्वामी अग्निवेश यांनी वॉर्डनची बाजू घेत विद्यार्थिनीचे पालक आणि मीडियाला जबाबदार धरलं आहे. वॉर्डनने दिलेली स्वमुत्रप्राशनाची शिक्षा ही फारशी गंभीर बाब नाही, असं स्वामी अग्निवेश यांचं म्हणणं आहे. “साध्या शुल्लक शिक्षेचा विद्यार्थिनीचे पालक आणि मीडियाने चुकीचा अर्थ काढून त्याला विनाकारण प्रसिद्धी दिली आहे.” असं स्वामी अग्निवेश म्हणाले.
“घरात ज्याप्रमाणे पालक मुलांना वळण लावण्यासाठी रागावतात, शिक्षा करतात, त्याप्रमाणेच या वृर्डनने सद्हेतूने ही शिक्षा दिली होती. मात्र, मीडियाने या शिक्षेचा विनाकारण विकृत अर्थ काढला आहे. देशात याहून महत्वाच्या समस्या आहेत. मीडियाने त्याकडे लक्ष द्यावे.” असं स्वामी अग्निवेश म्हणाले.