शरद पवारांचा काँग्रेसवर रूसवा कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार पु्न्हा नाराज झाले आहेत. हे त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत आहे. याआधी नंबर दोनवरून धुसफुस झालेल्या पवारांनी राजीनाम्याची तयारी चालविली होती. त्याबाबत मीडियात खूप चर्चा झाली. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. आता तर त्यांनी चहापानाला अनुपस्थिती दर्शवली.

Updated: Jul 23, 2012, 12:33 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार  पु्न्हा नाराज  झाले आहेत. हे त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत आहे. याआधी नंबर दोनवरून धुसफुस झालेल्या पवारांनी राजीनाम्याची तयारी चालविली होती. त्याबाबत मीडियात खूप चर्चा झाली. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. आता तर त्यांनी चहापानाला अनुपस्थिती दर्शवली.

राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या चहापानाला पवार अनुपस्थित राहिले. तसंच प्रणव मुखर्जी यांचेही त्यांनी अभिनंदन केलेलं नाही. त्यामुळं पवारांची नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. आज शरद पवार प्रणव मुखर्जींची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळेला नाही. काँग्रेस पवारांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का, हा प्रश्न कायम आहे.

प्रणव मुखर्जी यांनी मोठा विजय मिळवत देशाचे १३वे राष्ट्रपती म्हणून आपलं स्थान नक्की केलं. प्रणव मुखर्जींनी विजयाला आवश्यक असलेली मतं मिळवताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला तर तिकडे रायसीना हिलवर मावळत्या राष्ट्रपतींचे आभार मानून निरोप देण्यासाठी पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, केंद्र सरकारमधील घटक पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादीने प्रणवदा यांचे साधे अभिनंदनही केलेले नाही. सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांनी प्रयत्न केला असताना राष्ट्रपतीनिवडणींतर साधे लक्षही घातले नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीपुढे झुकेल काय, याची चर्चा सुरू आहे.