अजित पवारांनी मुंडेंना 'करून दाखवलचं'

बीडमध्ये गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अमरसिंह पंडीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं बीड झेडपीची सत्ता समीकरणं बदलेलेली आहेत.

Updated: Mar 21, 2012, 09:53 AM IST

www.24taas.com, बीड

 

बीडमध्ये गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अमरसिंह पंडीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं बीड झेडपीची सत्ता समीकरणं बदलेलेली आहेत.

 

पंडीत यांच्या आघाडीला ५ जागा मिळाल्या आहेत. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे २९. पंडीत यांच्या ५ सदस्यांच्या साथीनं सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ३१ चा आकडा राष्ट्रवादीनं गाठला आहे.

 

गोपीनाथ मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे २२ सदस्य आहेत, तर एका अपक्षानंही भाजपला पाठिंबा दिला आहे. अमरसिंह पंडीत हे मुंडे समर्थक मानले जातात. त्यांच्या ५ सदस्यांच्या साथीनं बीड झेडपीत सत्तास्थापन करण्याचा गोपीनाथ मुंडेंचा प्रयत्न होता. मात्र अमरसिंहांना फोडत बीड झेडपीत सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला.