डॉ. बापुसाहेब काळदाते यांचं निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बापुसाहेब काळदाते यांचं निधन झालयं. औरंगाबादमधील एम.जी. एम हॉस्पिटलमध्ये उरचार सुरू असतांना त्यांचं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.

Updated: Nov 17, 2011, 05:46 AM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बापुसाहेब काळदाते यांचं निधन झालयं. औरंगाबादमधील एम.जी. एम हॉस्पिटलमध्ये उरचार सुरू असतांना त्यांचं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.

एक धुरंधर समाजसेवक, परखड वक्तव्य करणारा नेता अशी बापूसाहेबांची ओळख होती. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. विधानसभा तसेच लोकसभेत बापुसाहेबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९६७ मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत लातूर मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फ त्यांची निवड झाली. त्यानंतर राजकीय पटलावरील त्यांचा आलेख उंचावत गेला. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरक भाषणांनी त्यांनी अनेक सभा तसचं संसदेचं सदन गाजवलं. सत्तेचं त्यांना कधीच आकर्षण वाटलं नाही. सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र असले तरी त्यांनी मित्र जोडण्यासाठी तत्वाशी आणि धोरणाशी कधीही तडजोड केली नाही.

 
कथा-किर्तनकार, प्रवचनकार ही सगळी कौशल्यं त्यांच्यात भिनल्यानं ते सर्वांना जवळचे वाटत. जयप्रकाश नारायण यांच्या आश्रमात काम करण्याची संधीही बापूंना मिळाली. आणीबाणीत अठरा महिन्यांच्या तुरूंगवासाच्या काळात त्यांनी तरूण राजकैद्यांचे नितीधैर्य टिकावे म्हणन सातत्यानं त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या मृत्यूनं सर्वसमान्यांसाठी झगडणारा नेता हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होतीय. आज संध्याकाळी चार वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.