हर्षवर्धन जाधव मनसेला जय महाराष्ट्र करणार?

हर्षवर्धन पाटील मनसेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. जाधव आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकिटावर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Updated: Apr 2, 2012, 02:17 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

हर्षवर्धन पाटील मनसेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. जाधव आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकिटावर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून निवडून आले आहेत.

मनसे नेत्यांनी धोका दिल्याची खंत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मदत केल्याने जाधव नाराज झाले होते. हर्षवर्धन जाधव शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.