कल्याण पालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.

Updated: Dec 22, 2011, 09:00 PM IST

झी २४ तास वेब टीम, कल्याण

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे हे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे तसंच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.

 

जळगाव मनपाचे निलंबित कर्मचारी सुभाष सोनार यांनी जळगावच्या तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये.  सरकारी निवासस्थानात ते राहत होते,पण त्यांची बदली झाली. त्यांना निवासस्थान सोडण्यासाठी सोनावणे यांनी दमदाटी केल्याची तसंच घरातलं सामान बाहेर फेकल्याची तक्रार करण्यात आलीये. याप्रकरणी सोनावणे यांच्यासह उपायुक्त आर.आर.काळे तसंच इतर ११ जणांवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

 

रामनाथ सोनावणेंची काही दिवसांपूर्वीच कल्याण-डोंबिवलीचे आय़ुक्त म्हणुन बदली झालीये. त्यांना याविषयी विचारलं असता, सोनार हे बेकायदेशीररित्या हॉस्पिटलमधील खोली वापरत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याचं सोनावणेंनी सांगितलंय.

 

या प्रकरणाला मुद्दामहून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आयुक्त सोनावणे यांनी केलाय. त्यामुळं या सगळ्या प्रकारात नेमकं सत्य काय, हे पोलिसांच्या चौकशीतून बाहेर यावं, अशी अपेक्षा स्रवसामान्य व्यक्त करताहेत.