ठाणे जिल्ह्यातील मोनो रेल्वे प्रकल्प रद्द

ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित ठाणे-भिवंडी-कल्याण मोनो रेल्वे प्रकल्प कागदावर तयार होण्याच्या आधीच रद्द करण्याचे संकेत एमएमआरडीने दिले आहेत.

Updated: Mar 7, 2012, 11:54 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित ठाणे-भिवंडी-कल्याण मोनो रेल्वे प्रकल्प कागदावर तयार होण्याच्या आधीच रद्द  करण्याचे संकेत एमएमआरडीने दिले आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी ठाणे - भिवंडी - कल्याण मार्गावर ३० किमी लांबीच्या आणि सुमारे ३,७५० कोटी रुपयांच्या मोनो रेल्वे प्रकल्पाची एमएमआरडीएने घोषणा केली होती.

 

या प्रकल्पाचे ठाणे जिल्ह्यातून स्वागत झाले. उलट कल्याणच्या पुढे हा प्रकल्प बदलापूरपर्यंत नेण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली. मात्र या प्रकल्पाचा खर्च जास्त आणि तुलनेत प्रवाशांची संख्या कमी असं प्रकल्पाचा आराखडा तयार करतांना लक्षात आले.

 

तेव्हा मोनो रेल्वेचा दुसरा नवीन मार्ग आखण्याची किंवा नव्या मार्गाच्या ठिकाणी मेट्रो उभारता येईल का याची चाचपणी एमएमआरडीएने सुरु केली आहे. त्यामुळे ठाणे-भिवंडी-कल्याण या मोनो रेल्वेबद्दल लोकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना हा संपुर्ण प्रकल्पच रद्द झाल्यात जमा आहे.