ठाणे: युनिव्हर्सल स्कूल बसला खंडाळा घाटात अपघात

ठाण्यातल्या युनिव्हर्सल स्कूलच्या सहलीच्या बसला खंडाळा घाटात अपघात झाला आहे. अपघातात १० शाळकरी मुलांसह चौदाजण जखमी झाले आहेत. यात दोन शिक्षिका आणि ड्रायव्हर, क्लिनरचाही जखमींमध्ये समावेश आहे.

Updated: Dec 29, 2011, 03:39 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

ठाण्यातल्या युनिव्हर्सल स्कूलच्या सहलीच्या बसला खंडाळा घाटात अपघात झाला आहे. अपघातात १० शाळकरी मुलांसह चौदाजण जखमी झाले आहेत. यात दोन शिक्षिका आणि ड्रायव्हर, क्लिनरचाही जखमींमध्ये समावेश आहे. कोल्हापूरहून सहलीहून परतताना पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरच्या अमृतांजन ब्रिजजवळ हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना निगडीच्या लोकमान्य आणि बेलापूरच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

खंडाळ्याजवळ स्कूल बसचा झाला अपघात झाल्याने  ठाण्याच्या मुलं जखमी झाल्याचे समजते, समोर असणाऱ्या डिव्हायडरला बसने जोरदार  धडक दिल्याने बस पलटी झाल्याचे कळते. एक्सप्रेस हायवेवरील अमृतांजन ब्रिजजवळ हा अपघात झाला.  ठाण्यातील 'युनिवर्सल स्कूल' शाळेतील मुलं पिकनिक वरून परत येताना बसला अपघात झाला.  य़ा अपघातात  १४ जण जखमी झाल्याचे समजते.