www.24taas.com, दिवे आगर
रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशमूर्तीप्रमाणेच हुबहुब चांदीची मूर्ती पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांनी तयार केली आहे. या मूर्तीला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला असून ही मूर्ती दिवे आगरमधील मंदिरात बसवण्यासाठी आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
गेल्या महिन्यात दिवे आगरमधल्या सुवर्ण गणेश मंदिरात दरोडा पडला होता. दोरोडेखोरांनी सुरक्षारक्षकांना ठार करून सुवर्ण गणेशमूर्ती लांबवली होती. महिन्याभरानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र दरोडेखोरांकडून सोन्याची गणेश मूर्ती वितळवण्यात आल्यानं आता नव्या मूर्तीची स्थापना मंदिरात करावी लागणार आहे.
मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे. या मूर्तीवर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे, अशी माहितीही घोडके यांनी दिली.