सेना-काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा दणका...

ठाण्यातल्या महापालिका विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. ठाणे महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ सर्वाधिक आहे.

Updated: May 1, 2012, 07:17 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यातल्या महापालिका विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. ठाणे महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ सर्वाधिक आहे. मात्र तरीही ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची निवड महापौरांनी केली होती.

 

शिवसेना आणि काँग्रेसच्या हातमिळवणीतून हा प्रकार घडला होता. तसचं मनोज शिंदे यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादीचे पत्र उशिरा आल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर या वादातून ठाणे महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये राडाही झाला होता.

 

या निवडीला राष्ट्रवादीनं आधी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं, त्यावेळी हायकोर्टानं १५ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणीवेळी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

 

 

 

Tags: