झी २४ तास वेब टीम, उरण
रेव्ह पार्टीचं प्रमाण वाढत असल्याने मुंबई पोलीस नेहमीच सतर्क असतात त्यामुळे या सारख्या पार्ट्यांना आळा बसावा यासाठीच पोलीस आता अशा पार्ट्यांवर नजर ठेऊन आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस चांगलेच सतर्क झाले आहे.
नवी मुंबई पोलीसांनी उरणमध्ये सुरु असलेल्या एका बोट पार्टीवर छापा टाकला. पार्टीत ड्रग्जचा वापर केला जात असल्याचा पोलीसांना संशय होता. पोलीस तपासात ड्रग्ज मिळालं नाही मात्र मोठ्या प्रमाणात दारु जप्त करण्यात आली. एका खाजगी कंपनीचे सदस्य ही पार्टी करत होते. पोलिसांनी छापा मारला तेव्हा एकूण ८९ जण आणि २० स्टाफ मेंबर हजर होते. आयोजकांकडे दारुची पार्टी करण्यासाठी अबकारी विभागाचं एनओसी होतं. पोलीसांनी पार्टीच्या आयोजकांविरुद्ध मुंबई पोलीस ऍक्ट आणि नॉईस पोल्युशन ऍक्टखाली गुन्हा दाखल केला.