भिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग

ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.

Updated: Jan 14, 2012, 08:41 AM IST

www.24taas.com , ठाणे

 

ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली  भीषण आग  अटोक्यात आलीय. कंपनीच्या आजूबाजूला रहिवाशी वस्ती असल्यानं त्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. आगीत कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.

 

भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती. अग्निशमनदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आलीय.१० ते १२ बंबांच्या सहायाने ही आग आटोक्यात आण्यात यश आलंय. सध्या कंपनीत कुलींगच काम सुरु आहे. आग कशामुळे लागली होती यांचं कारण अद्यापही समजू शकलं नाही.

 

दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईतील कांजुरमार्गच्या आनकार हिरानंदानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली.  पोलीस या आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.

 

अवघ्या काही क्षणातच या इमारतीचे दोन मजले आगीच्या विळख्यात सापडले. कपडे आणि प्लास्टिकचा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्यामुळं ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पंधरा बंब गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. यांत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नसलं तरी लाखो रुपयांचा माल आगीत जळून खाक झालाय.

 

[jwplayer mediaid="29023"]