रत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची 'कृपा'

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.

Updated: Mar 20, 2012, 04:59 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.

काँग्रेसचे वादग्रस्त नेते कृपाशंकरसिंह यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावातली १०५ एकर जमीन मृत व्यक्तीला जिवंत दाखवून फक्त ५ लाखात लाटल्याचं झी २४ तासनं उघड केलं होतं. आता त्याच जमीनीतला आणखी एक घोटाळा समोर आलाय. याच जमिनीत सात ते आठ टुमदार बंगले बांधण्यात आलेत. मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीकडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. या बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडं दोन हजार साली परवानगी मागितली होती. मात्र ग्रामपंचायतीनं अजूनही ती दिलेली नाही. मग परवानगी नसताना बंगले बांधलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ग्रामपंचायतीनं अहवाल दिल्यानंतर पंजायत समिती या जमिनीतली बांधकामे जमीनदोस्त करणार आहे. इतके दिवस हे बेकायेदशीर बांधकाम ग्रामपंचायतीच्या लक्षात कसे आले नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल कोण दोषी आहेत याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.