विद्यार्थ्याला गमवावा लागला पाय

डोंबिवलीतल्या एस के बोस शाळेतल्या विद्यार्थ्याला पाय गमवावा लागला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच डोंबिवलीतल्या आणखी एका विद्यार्थ्याचा पाय मोडलाय. यावेळीही शाळेनं विद्यार्थ्यालाच दोषी ठरवलंय.

Updated: Dec 3, 2011, 11:07 AM IST

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली

 

डोंबिवलीतल्या एस के बोस शाळेतल्या विद्यार्थ्याला हात गमवावा लागला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच डोंबिवलीतल्या आणखी एका विद्यार्थ्याचा पाय मोडलाय. यावेळीही शाळेनं विद्यार्थ्यालाच दोषी ठरवलंय.

 

त्याजे नाव आहे ऐश्वर्य पौळेकर. डोंबिवलीतल्या स्वामी विवेकानंद शाळेत तो सहावीत शिकतो. शाळेत गॅदरिंगसाठी डान्स आणि खेळांचा सराव सुरूय. ऐश्वर्य त्याच्या वर्गात कबड्डीचा सराव करत होता. त्यात त्यानं एका मुलाला ऑऊट केलं. त्याचा राग मनात धरून तो मुलगा ऐश्वर्यच्या पायावर बसला. त्यामुळं ऐश्वर्यच्या मांडीचं हाड तुटल्य़ाचं ऐश्वर्यच्या वडिलांचं म्हणण आहे. 

 

शाळा भरण्य़ापूर्वी हा प्रकार घडला, असं सांगत शाळेनं घडल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.  पण ऐश्वर्यसोबत ही घटना घडली त्यावेळी शिक्षक कुठे होते? विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची शिक्षकांची जबाबदारी नाही का? असं विचारताच त्याला शिक्षकांचं उत्तर होतं ते असं. शाऴेच्या बाहेर ही घटना घडली आहे. त्यामुळं या प्रकाराला शाऴा जबाबदार नाही. 

 

 ऐश्वर्यला केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेल असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला मुंबईत केईएम हॉस्पिटलला हलवण्यास सांगितलं. या सर्व प्रकाराला शाळा जबाबदार असल्याचं शाळा प्रशासन मान्य करायला तयार नाहीये. विद्यार्थ्यांनाच दोषी धरत शाळेनं हात वर केलेत.