कापसाला सहा हजार रुपये हमी भाव दिला नाही तर येत्या 15 डिसेंबरला कापूस उत्पादक पट्ट्यात बंद पाळण्याचा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिला. शिवसेनेच्या कापूस दिंडीचा समारोप आज उद्धव यांच्या उपस्थितीत वर्ध्यात झाला तेव्हा त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
किंगफिशर, लवासासाठी धावपळ करणारं सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर उदासिन का असा सवाल करत त्यांनी पवारांनाही टीकेचं लक्ष्य केलं. पेट्रोलच्या दरवाढीवरून सरकारबाहेर पडण्याची धमकी ममता बॅनर्जी देतात, तसा दबाव शरद पवारांनी कापूस उत्पादक शेतक-यांसाठी का टाकत नाहीत असा सवाल उद्धव यांनी केला.