दारूड्या पोलिसाचा गोळीबार, एक ठार

अमरावतीत एका दारुड्या पोलिसांनं गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या परतवाडा पोलीस ठाण्यात ही घटना घ़डली आहे. रामेश्वर धाकुडे अस ं या पोलिसाचं नाव आहे.

Updated: May 7, 2012, 12:46 PM IST

www.24taas.com, अमरावती

अमरावतीत एका दारुड्या पोलिसांनं गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या परतवाडा पोलीस ठाण्यात ही घटना घ़डली आहे. रामेश्वर धाकुडे अस ं या पोलिसाचं नाव आहे.

दारूच्या नशेत असल्याने सकाळी या पोलिसाने गोळीबार केला होता. त्याच्याजवळ असलेल्या सर्व्हिस रिव्हॉलर मधून हा गोळीबार केला. त्याने केलेल्या गोळीबारात नजीकच्या एका इसमला ह्या बंदूकीतून सुटलेली गोळी लागली. सदर इसमाला रूग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्याचा जीव गेला.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हटंणाऱ्या पोलिसांनेच असं कृत्य केले आहे. पोलिसांनी त्या दारूड्या पोलिसाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. दारूच्या नशेत त्याने हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.