www.24taas.com, गडचिरोली
नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंद दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम भागात वाहतूक ठप्प होती. बाजारपेठही बंद होती. नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर टाकण्यात आली आहेत.
धानोरा परिसरात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना लक्ष्य करणारी आणि 'ऑपरेशन ग्रीन हंट'ला स्थगिती देण्यासंदर्भात पत्रके टाकली. गडचिरोलीच्या सीमेवर छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातल्या करमेंटा जंगलात एका पुलाच्या बांधकामावर तीन वाहनं नक्षलवाद्यांनी जाळली. सुमारे दिडशे नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. ही घटना गडचिरोली सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर घडली.
या ठिकाणी असलेली बांधकाम मजुरांची झोपडीही जाळण्यात आली. सुरक्षा दलांनी नक्षल चळवळीविरोधात चालविलेले 'ऑपरेशन ग्रीन हंट' प्रभावी होत असल्याचं चित्र आहे. सुरक्षा दलांच्या दबावामुळे नक्षलवादी हतबल झालेत.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="102760"]