नागपुरात बंटी- बबलीचा विद्यार्थ्यांना गंडा

नागपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या बंटी - बबली दुकलीला अटक केलीय.

Updated: Dec 8, 2011, 05:19 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 
नागपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या एका जोडप्याला अटक केलीय.

 

शिल्पा आणि राजू पालपराती या दांपत्यानं 12 विद्यार्थ्यांची फसवणूक केली. परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून या बंटी - बबली दुकलीनं विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या दांपत्यानं विद्यार्थ्यांकडून तीस लाख रूपये उकळले.

 

विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल व्हिसावर विदेशात नेऊन त्यांना तिथंच सोडण्यात आलं होतं. हा प्रसंग आठवल्यानंर आजही विद्यार्थ्यांना धडकी भरते.