मिहान प्रकल्पाचे काम पाडले बंद

नागपूरातील मिहान प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. शिवणगावच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग वे-चं काम बंद पाडलंय. आधी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा, मगच काम सुरू करू देऊ, असा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.

Updated: Jul 8, 2012, 08:49 PM IST

www.24taas.com, नागपूर

नागपूरातील मिहान प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. शिवणगावच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग वे-चं काम बंद पाडलंय. आधी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा, मगच काम सुरू करू देऊ, असा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.

मिहान प्रकल्पाचं काम सुरू तर झालंय. मात्र ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची समस्या आहे तशीच आहे. पुनर्वसनाबाबत कोणतंही ठोस पाऊल उचलले जात नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. म्हणूनच आधी पुनर्वसन करा, मगच काम सुरू करा, असा पवित्रा घेत शिवणगावातील ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग वे-साठी सुरू असलेल्या टॅक्सी वे-चं काम बंद पाडलं.

ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावर प्रकल्पाचे अधिकारीही काहीही ठोस भूमिका घेत नसल्याचंचं चित्र दिसतंय. 2008 मध्ये प्रकल्पग्रस्तांचे नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनाही भेटले होते. त्यावेळी ग्रामस्थांचं पुनर्वसन करू, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, चार वर्ष उलटूनही परिस्थिती जैसे थेच आहे.