अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे उध्वस्त

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.

Updated: May 11, 2012, 09:14 PM IST

योगेश खरे, www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.

गेले तीन महिने घाम गाळून तयार झालेला कांदा शेतात वाळवण्यासाठी ठेवला होता. अचानक आलेल्या वादळी पावसानं  कांदा ओला झाला आणि सडला. दिंडोरी तालुक्यातल्या शेतातली ही परिस्थिती नुससानीचा अंदाज येण्यासाठी पुरेशी आहे. कांद्याबरोबर द्राक्षाचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. पालेभाज्याही शेतात सडायला लागल्या आहेत. वांगी पिवळी पडली आहेत. फळभाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळाचे चटके सहन करतोय. त्यातच कांद्याच्या दराचं घोंगडं अजूनही भिजतंच आहे. आता पावसानंही कांदा पुरता सडवलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आता शेतीच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.