घोटाळा लपवण्यासाठीच जैनांचे पक्षांतर- खडसे

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं.

Updated: Mar 12, 2012, 03:43 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं. आपण सुरेशदादा जैनांकडे राजीनामा मागणार नाही त्याबाबत शिवसेनेने निर्णय घ्यायचा आहे. घरकुल घोटाळ्यात जैन यांची खानदेश विकास आघाडीच मोठ्या प्रमाणावर सहभागी होती असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अशा घोटाळ्यांचे समर्थन सेना करणार नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन कारवई करु असं म्हटलं आहे.सुरेशदादा जैन यांच्यावरील कारवाई राजकीय हेतुने प्रेरित नसून कायदाला धरुन असल्याचं सांगताना गुलाबराव देवकरांबद्दल आर.आर.पाटील यांनी मौन बाळगलं.

 

सुरेश जैन यांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.