पुन्हा एकदा भीषण अपघात, ८ ठार

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.

Updated: Apr 8, 2012, 03:16 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात अमळनेर चोपडा रस्त्यावर घडला आहे. ट्रक आणि रिक्षाची धडक होऊन त्यात ३ प्रवासी ठार तर ६ जण जखमी झाले आहेत.

 

तर दुसरा अपघात घडला नागपूर-सूरत मार्गावर खेडी गावाजवळ. बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ५ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. शेगावहून परतत असताना भाविकांच्या गाडीला मध्यरात्री हा अपघात झाला आहे.

 

मृतांमध्य़े एका लहान मुलाचा तर जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बोलेरो गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.