महिन्याभराच्या मुलीला आईने जाळून मारले

पती-पत्नीच्या भांडणात आईनं आपल्या पोटच्या मुलीलाच निर्दयीपणे ठार केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या तांदळवाडीत घडली आहे. रागाच्या भरात आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव घेतला आहे.

Updated: Jun 27, 2012, 10:11 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

पती-पत्नीच्या भांडणात आईनं आपल्या पोटच्या मुलीलाच निर्दयीपणे ठार केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या तांदळवाडीत घडली आहे. रागाच्या भरात आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव घेतला आहे.

 

दर्शिता चौधरी या महिन्यांच्या चिमुरडीला झोळीतचं जाळून मारण्याचं निर्दयी कृत्य तीची आई रुपाली हीनं केलं. ९० टक्के होरपळेलेल्या चिमुरडीचा जळगाव जिल्हा रुग्णालयात नेताना दुर्दैवी अंत झाला.

 

सुन्न करणाऱ्या या घटनेची पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चौधरी कुटुंबियांनी मात्र आपल्याला या घटनेची काहीच माहिती नसल्याचा आव आणला आहे.