राज्यमंत्री देवकरांना जामिन मंजूर

जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

Updated: May 21, 2012, 07:03 PM IST

 www.24taas.com, जळगाव

 

जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. देवकर यांच्यासह अन्य २० जणांना जामीन मंजूर झाला आहे.

 

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक अखेर करण्यात आली होती. शनिवारच्या चौकशीला गैरहजर राहिलेल्या गुलाबराव देवकरांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

 

देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही आहेत. २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेले दुसरे मोठे दिग्गज आहेत. यापूर्वी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती.