सुरेश जैन यांना रुग्णालयात केले दाखल
सुरेश जैन यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Oct 22, 2019, 11:02 PM ISTजळगाव । घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड
घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.
Aug 31, 2019, 06:35 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व दोषींना कारावासासह दंडाची शिक्षा
घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
Aug 31, 2019, 05:41 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार?
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळतेय
May 21, 2019, 09:31 AM ISTधुळे : दोंडाईचा पालिका निवडणुकीत 'घरकुल' कळीचा मुद्दा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:28 PM ISTसुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Sep 2, 2016, 12:14 PM ISTधुळे - घरकुल घोटाळ्याचा कर्दनकाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 09:03 PM ISTसुरेश जैन यांचा जेलचा मुक्काम वाढला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आमदार सुरेश जैन यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. जैन यांनी वर्षभर कोणत्याही कोर्टात जामीनासाठी अर्ज करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Oct 7, 2013, 01:51 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.
Dec 17, 2012, 06:10 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
जळगाव पालिकेच्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला.
Oct 6, 2012, 10:43 PM ISTगुलाबराव देवकरांना पुन्हा एकदा नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यमंत्री गुलाबराव देवकरांना नोटीस बजावली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर सध्या जामिनावर आहेत. मात्र या जामिनासंदर्भातली सर्व कागदपत्र 18 जुलैला कोर्टात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
Jul 5, 2012, 07:14 PM ISTराज्यमंत्री देवकरांना जामिन मंजूर
जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.
May 21, 2012, 07:03 PM ISTघरकुल घोटाळा २५ नगरसेवकांना कोठडी
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातल्या १५ आरोपींना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दहा आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
May 19, 2012, 08:21 PM ISTसुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजुर केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जैन यांना पंधरा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने दिला.
Mar 22, 2012, 04:30 PM IST