वाळू माफियांचं काही खरं नाही

जळगावात गिरणा नदीच्या पात्रात वाळू चोरी करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

Updated: May 7, 2012, 08:16 AM IST

www.24taas.com, जळगाव

जळगावात गिरणा नदीच्या पात्रात वाळू चोरी करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत वाळूचे ट्रॅक्टर्स आणि दोन ट्रक असा सुमारे चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय वाळू चोरी केल्याप्रकरणी काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तहसिलदारांनी केली आहे.

गुरुवारी मेहुणबारे गावात वाळूमाफियांनी चाळीसगावच्या तहसीलदारांची गाडी पेटवून दिली होती.. त्यानंतर प्रशासनानं वाळूमाफियांविरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे.